एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे

पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू व बाधितांच्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.
दापोडी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्र. १४६/२०२६ तसेच हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्र. ३७९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार दिनांक २९ मे २०२६ रोजी या दोन्ही गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत दापोडी परिसरात ११ जणांचा मृत्यू झाला असून हडपसर परिसरात ४० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दापोडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link