रूपेश उडान गडचिरोली प्रतिनिधी
हिवरगावमध्ये जनावरांच्या आरोग्यासाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित
केवलरामजी हार्डे कृषी महाविद्यालय, चामोर्शी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या READY कार्यक्रमाअंतर्गत हिवरगाव येथे पशुधन लसीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे आयोजन कृषीदूत विद्यार्थिनी ऋतु गुरनुले, आचल जुवारे, मधुरा कन्नमवार, अनुष्का कनपर्तीवार व डिंपल कापसे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. लोखंडे तसेच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हेमंत कोलते उपस्थित होते. त्यांनी पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर लसीकरणाचे महत्त्व सांगितले. आणि विविध प्रकारच्या लसीकरणाबाबद माहित दिली. विविध संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी नियमित लसीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले तसेच पशुपालकांना जनावरांची स्वच्छता, पोषण व्यवस्थापन व रोग प्रतिबंधक उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली. गावातील शेतकरी व पशुपालकांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिनेश सुरजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच RAWE कार्यक्रम प्रमुख के. डी. गहाने आणि अभ्यासक्रम शिक्षक एस. एस. सरदारे यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पडला.








