एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चेतना लॉन परिसर व शिल्पा गार्डन परिसर येथे वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई.

चेतना लॉन परिसर व शिल्पा गार्डन परिसर येथे वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई.

प्रतिनिधी रणजीत मस्के

मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये आज दि. २८/०५/२०२६ रोजी १६.०० ते २१.०० वा. पावेतो चेतना लॉन परिसर व शिल्पा गार्डन परिसर येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली. सदर नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीर रित्या जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी तसेच शहरी भागात प्रवेशबंदीच्या वेळेत बेकायदेशीर रित्या प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा (MV Act) अंतर्गत विशेष कारवाई करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी शहरामध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी आदेश लागू केलेले असताना देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जानेवारी २०२६ पासून अद्यापपर्यंत एकूण ३७४८ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असुन एकुण रु. ४६,५७,५००/- इतका दंड करण्यात आलेला आहे.

आज करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एकूण १६६ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका वाहन चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे

नाकाबंदी दरम्यान नियमभंग करणाऱ्या मोटार वाहन कायद्याच्या कलमांनुसार एकुण १३१ वाहनांवर ई-चालनाद्वारे कारवाई करण्यात आलेली असुन प्रवेशबंदी आदेश उल्लंघन केलेल्या एकुण अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे, सदर वाहनांवर एकुण 2550 रुपये दंड करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर शहर विभाग यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी शामुवेल गायकवाड, पोउपनिरी अन्सार शेख, सफौ कोडम, पोहवा कांबळे, पोशि/ चव्हाण, पोशि/ खंडागळे, पोशि/दळवी, पोशि दहिफळे, पोशि/ राठोड यांचे द्वारे करण्यात आली.

याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. वैध वाहन परवाना (Driving Licence) शिवाय वाहन चालवू नये. वाहन चालविताना परवाना, नोंदणी प्रमाणपत्र (RC), विमा प्रमाणपत्र (Insurance) व प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

वाहनांवर काळी काच लावू नये. वाहनाचा नोंदणी क्रमांक (Number Plate) नियमानुसार, स्पष्ट व वाचनीय स्वरूपात प्रदर्शित करावा. फॅन्सी नंबर प्लेट, बदल केलेले / फटाका सायलेन्सर, अनधिकृत बदल (Modification) करू नयेत.

दुचाकीवर तिघेजण बसू नयेत (ट्रिपल सीट प्रवास टाळावा). दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा व चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. वेगमर्यादेचे पालन करावे व वाहतूक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व इतर सर्व वाहतूक चिन्हांचे पालन करावे.

सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link