भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी विशेष मोहीमे अंतर्गत आरोपीकडुन दोन गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे जप्त
प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
दिनांक २६/०५/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचं अधिकारी पालीग निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश, चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सुदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे एक इसम अग्नीशस्त्र घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अमलदार यांनी सुदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे जावुन बातमीप्रमाणं इसमाचा शोध घेतला असता सदर ठिकाणावरील गुरुदत्त मित्र मंडळाचे मंदीरालगतचे मोकळया जागेमध्ये इसम नामे सोहम गोविंद धमाळ, वय १८ वर्षे ७ महीने, रा. फ्लॅट नंबर २०३, पुण्यनगरी सोसायटी, आयप्पा मंदीराजवळ, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव-शेरी, पुणे हा त्याचे ताव्यात १,०१०००/- रुपये किंमतीचे दोन गावठी बनावटीचा कड़े व दोन जिवंत काडतुसां सहीत दिनांक २०/०५/२०२६ रोजी १३.२३ वा मिळून आल्याने त्याचेकडुन दोन गावठी बनावटीचा कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंवर ३१४/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस ऑर्धानयम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि स्वप्निल पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेशीत केलेल्या विशेष माहीमे अंतर्गत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. संजय दराडे सो, पालोस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चोधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश वारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.








