एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर धडक कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर धडक कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

उप संपादक | प्रणित काठोके

अन्न व औषध प्रशासन, जळगाव भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर धडक कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे भवरखेड, ता. धरणगाव येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असून आरोपीविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २७ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) हा खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला आढळून आला. तपासणीमध्ये रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील वसा (फॅट) वाढविण्यासाठी होत असल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा पंच भवरखेडेचे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

दरम्यान, आरोपी सोमनाथ माळी हा लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये दि. २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही दुधात भेसळ केल्याप्रकरणी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. त्या प्रकरणी दि. २९ जुलै २०२५ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित व्यक्ती वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भा.प्र.से. तसेच सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार व आकाश बोहाडे यांनी सहभाग घेतला.

परिसरात कुठेही बनावट दूध अथवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link