एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे धडक कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे धडक कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

उप संपादक | प्रणित काठोके

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाच्या पथकाने भोकर येथे धडक कारवाई केली.

दि. २७ मे २०२६ रोजी मु. पो. भोकर, ता. जि. जळगाव येथील “श्री चक्रधर रेस्टॉरंट अॅण्ड कोल्ड्रींक्स” या आस्थापनाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित रेस्टॉरंटमधून दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले असून, प्रकरणी पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) स. कृ. कांबळे यांनी दिली.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच सह आयुक्त (नाशिक विभाग) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अन्नासंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा acfdajalgaon@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालय, आंबेडकर मार्केट, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link