एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बकरी ईद च्या पार्श्वभूमींवर उंब्रज पोलिसांचा रूट मार्च, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा:- सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे आव्हान

बकरी ईद च्या पार्श्वभूमींवर उंब्रज पोलिसांचा रूट मार्च, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा:- सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे आव्हान ! (सातारा जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक 26/05/2026 रोजी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलिसांनी आपल्या हद्दीमध्ये रूटमार्च काढत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा असा संदेश पोलिसांकडून देण्यात आला. बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच हद्दीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडून हे आणि बकरी ईद हा सण अगदी भयमुक्त वातावरणात शांततेत पार पडावा म्हणून रूट मार्च घेण्यात आला. सदरचा रूट उंब्रज पोलीस ठाण्यापासून ते उंब्रज शहरांतील बाजारपेठा तसेच ग्रामीण भागातील गावांमधून या गावांमध्ये सदरचा रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये 2 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार, 39 होमगार्ड लाटी हेल्मेटसह तसेच 04 शासकीय वाहने असा ताफा या रूट मार्च मध्ये सहभागी झाला होता. सण उत्सव आनंदाने साजरे करावेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच जातीय सलोखा राखून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी केले आहे. सदर रूट मार्च हा आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर मॅडम आदरणीय उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पोलीस ठाण्यातील आदीं कर्मचाऱ्यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link