एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात विदेशी तरुणींकडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई

पुणे प्रतिनिधी राकेश गावडे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात विदेशी तरुणींकडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. नॉर्थ मेन रोडवरील लिबर्टी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या या प्रकाराचा पर्दाफाश करत पोलिसांनी केनिया देशातील चार तरुणींची सुटका केली. या प्रकरणी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील लिबर्टी सोसायटीमधील रो-हाऊस क्रमांक C-२५ येथे विदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. त्यानंतर संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ‘अभिभा स्टे’ C-२५ येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान केनिया देशातील चार तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ त्यांची सुटका करत आरोपीविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या रॅकेटमागे आणखी कोणते नेटवर्क कार्यरत आहे का, विदेशी तरुणींना पुण्यात कसे आणण्यात आले, त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आले होते का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link