सोलापूर शहरांत पोलीस उपायुक्त म्हणून प्रीतम यावलकरांची एन्ट्री, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहणार
सोलापूर जिल्हा रणजित मस्के प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रीतम यावलकर यांच्या आता नव्या एन्ट्री ने सोलापूर शहरांच्या पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती झाली असून तेथील त्यांनी पदभार स्वीकारून आपल्या कामकाजास प्रारंभ केला आहे. प्रीतम यावलकर हे यापूर्वी सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे ग्रामीणसह शहरांचा देखील दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांच्या आता नव्या एन्ट्रीमुळे कायदा आणि सुव्यवस्था नक्कीच अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. तर त्यांच्या झालेल्या रिक्त जागेवर सोलापूर शहरांतील पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे विजय कबाडे यांच्याकडे सोलापूर ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूरच्या शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासनात राज्य गृह विभागाकडून चांगलाच बदल दिसून आला आहे. शहरांकडे प्रीतम यावलकर शहर पोलीस उपायुक्त म्हणून तर ग्रामीणकडे विजय कबाडे या दोन्हीही अधिकाऱ्यांच्या इंट्रीमुळे नव्या कामकाजाला गती मिळणार आहे. तर ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून प्रीतम यावलकरांनी आपल्या कामाची आगळीवेगळी छाप पडली होती. त्यामुळे सोलापूर शहरांच्या पोलीस उपायुक्त पदावर देखील त्यांची दिमागदार एन्ट्री दिसून आली आहे.








