एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी | प्रणित काठोके

जिल्हाधिकारी जळगाव व पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी (एसडीओ), उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

बैठकीत कायदा व सुव्यवस्था तसेच महसूल व पोलीस प्रशासनाशी संबंधित विविध गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने तडीपारी व एमपीडीए अंतर्गत प्रस्तावांची कार्यवाही, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवरील कारवाया तसेच त्यावर प्रभावी उपाययोजना यांचा आढावा घेण्यात आला.

तसेच शस्त्र परवान्यांच्या पडताळणी व नियंत्रणाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. सरफेसी प्रकरणांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सर्व अधिकाऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार तातडीने व प्रभावी कारवाई करण्याचे आदेश देत नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link