एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद
उपसंपादक;- गणेश महाडिक
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने मोठी कारवाई करत बॉडी बिल्डिंग व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २७ हजार ४५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ मे २०२६ रोजी रात्री उशिरा ते २४ मेच्या पहाटेपर्यंत पुणे गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी हडपसर परिसरात एका व्यक्तीकडून प्रतिबंधित “MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA” या इंजेक्शनची विनापरवाना विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान आरोपी अभिषेक खंडू भडंगे (वय २५) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून प्रतिबंधित इंजेक्शनच्या ८२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या इंजेक्शनचा वापर शरीरसौष्ठव तसेच नशेसाठी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३७/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपीविरोधात यापूर्वीही हडपसर पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ आणि युनिट-७ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link