एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; तलाव व बाजार परिसरात ‘सेग-वे स्कूटर’वरून पेट्रोलिंग सुरू

नागपूर पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; तलाव व बाजार परिसरात ‘सेग-वे स्कूटर’वरून पेट्रोलिंग सुरू
प्रतिनिधी:- सतीश कडू
नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत ‘सेग-वे (बॅलन्सिंग स्कूटर)’च्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिहान इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने नागपूर पोलिसांना पाच सेग-वे स्कूटर्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, गर्दीच्या व संवेदनशील भागांमध्ये त्यांचा वापर केला जाणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, महापालिका आयुक्त विपिन इटनकर, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. पोलिस उपायुक्त (परिमंडळ क्र.१) यांच्या विशेष प्रयत्नांतून या स्कूटर्स नागपूर शहर पोलिस दलात दाखल झाल्या आहेत.
या सेग-वे स्कूटर्सचा वापर सोनेगाव तलाव परिसर, अंबाझरी फूटाळा तलाव परिसर, सीताबर्डी मार्केट, सक्करदरा ताजबाग परिसर आणि तहसील इतवारी मार्केट परिसरात पेट्रोलिंगसाठी करण्यात येणार आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.
या आधुनिक वाहनांमुळे गर्दीच्या भागात जलद गतीने हालचाल करणे शक्य होणार असून, चोरी, घरफोडी, महिलांशी संबंधित गुन्हे तसेच इतर कायदा-सुव्यवस्थेच्या घटनांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. तलाव आणि बाजार परिसरात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठीही या सेग-वे स्कूटर्सचा उपयोग होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागपूर शहर पोलिस दलात आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम आणि गतिमान पोलिसिंगचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link