एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वंचित बहूजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक मा. पंकज कुमावत यांचा सत्कार

वंचित बहूजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक मा. पंकज कुमावत यांचा सत्कार
————————————
प्रतिनिधी / अनिल चव्हाण

परभणी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मा. पंकज कुमावत यांनी पदभार स्वीकारला त्या बद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करूण सत्कार करण्यात आला.
दिनांक १८ मे रोजी परभणी येथे परभणी पोलिस अधिक्षक पदाची सुत्र स्विकारली मा. कर्तव्यदक्ष व गूंडांचा व अवैध्य धंदाच्या कर्दण काळ असलेले मा. पंकजजी कुमावत पोलिस अधिक्षकपरभणी यांचा प्रत्येक्ष भेट घेऊन पदभार स्विकारल्या बद्दल वॅचित बहूजन आघाडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत करण्यात आला. यावेळी पुढील प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मा. पकंजजी कुमावत यांच्या सारखा अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि जनसामान्यांप्रती संवेदनशील अधिकारी परभणी जिल्ह्याला लाभणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळेल तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख प्रशासन राबविण्याची परंपरा अधिक मजबूत व्हावी, युवकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि परभणी शहरासह जिल्हात शांतता, विकास व सामाजिक सलोखा यांचे आदर्श उदाहरण ठरावे, हीच अपेक्षा व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडी युवा परभणी (उ) जिल्हाध्यक्ष गणेश वाल्मीक गाढे, परभणी तालुकाध्यक्ष (उ) प्रमोद अशोकराव अंभोरे, परभणी महानगराध्यक्ष मुदस्सीर असरार, परभणी महानगर संघटक रंजीत मकरंद, परभणी युवा जिल्हा सचिव मोहन गाढे, परभणी युवा जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप पंडित, माजी परभणी जिल्हा महासचिव मुजफ्फर खान, समता सैनिक दलाचे विजयकुमार सावंत, सुशीलाबाई निसर्गन, पृथ्वीराज असले आदी वंचित बहूजन आघाडीचे प्रमोदजी अंभोरे यांच्यासह पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link