एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चिंचणी-वांगी पोलीस ठाणे नेहमीच प्रयत्नशील:- जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी

चिंचणी-वांगी पोलीस ठाणे नेहमीच प्रयत्नशील:- जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी ! ( सांगली जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. सांगली जिल्हा पोलिस दलाकडून चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल जगदीश घुगे यांना उत्कृंष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आला आहे.
उपविभागातील अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पोलिस पथकाच्या मदतीने चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा तपास लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३७ हजार रुपये किंमतीची ०३ देशी बनावटीची अग्निशस्त्रे, ०२ जिवंत काडतुसे तसेच ०४ मोटारसायकली जप्त केल्या.
या कारवाईमुळे चिंचणी-वांगी, कवठेमहांकाळ आणि कराड परिसरांतील मोटारसायकल चोरीचे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, ५, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या उपस्थितीत स.पो.नि. राहुल घुगे यांचा प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिंचणी-वांगी पोलिसांचेही परिसरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link