एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यावर बीड पोलिसांची दमदार कामगिरी:- पोलीस निरीक्षक मारुती खेडकर

 

अवैध दारु विक्री करणाऱ्या विरोधात पेठ बीड पोलीसांची कार्यवाही.

बीड प्रतिनिधी संगीता ईनकर

आज दिनांक 25/03/2025 रोजी 11.00 वाजता आरोपी नामे सचिन विठ्ठल वादे वय 38 वर्ष रा. नालवंडी ता. जि. बीड हा त्याचे टी.व्ही.एस. ईलेक्ट्रीक स्कुटी क्र. MH-23-BM-4836 यामध्ये अवैध विनापरवाना बेकायदेशीररीत्या विदेशी दारु विक्री करीता घेवुन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सापळा रचुन पोलीस ठाणे पेठ बीड चे अंमलदार यांनी कारवाई केली.

सदर रेडमध्ये आरोपी नामे सचिन विठ्ठल वादे याचे ताब्यातुन एकुन 117,900/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन नमुद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे पेठ बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह/1835 अजित हे करीत असुन सदरची कारवाई पोलीस ठाणे पेठ बीड पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोह/1835 अजित, पोअं/2218 विष्णु, पोअं/1551 पांडुरंग, पोअं/1960 अल्ताफ पोअं/1987 गिरी यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link