एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अजून एक बांगलादेशी घुसखोर महिला जळगाव पोलिसांच्या जाळ्यात; बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचा पर्दाफाश

अजून एक बांगलादेशी घुसखोर महिला जळगाव पोलिसांच्या जाळ्यात; बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचा पर्दाफाश

जळगाव उप संपादक| प्रणित काठोके

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेविरुद्ध जळगाव पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा क्रमांक २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत कलम २१, २२ व २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२) असे असून ती बांगलादेशातील भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. भारतात आल्यानंतर ती “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे वास्तव्यास होती.
प्राथमिक चौकशीत आरोपीने सन २००९ मध्ये एका दलालास ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून Samsung Galaxy मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात IMO व WhatsApp ॲपद्वारे बांगलादेशी कंट्री कोड (+880) असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे मिळाले. तसेच मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली.
पुढील चौकशीत आरोपीने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे रेशन कार्ड, Aadhaar कार्ड, मतदान ओळखपत्र, PAN कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे मे २०२३ मध्ये ती बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात आरोपीस बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट, दलाल आणि संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link