एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव एमआयडीसीत औद्योगिक सुरक्षा व गुन्हे प्रतिबंधासाठी पोलीस-उद्योजक बैठक

जळगाव एमआयडीसीत औद्योगिक सुरक्षा व गुन्हे प्रतिबंधासाठी पोलीस-उद्योजक बैठक

प्रतिनिधी | प्रणित काठोके

जळगाव : औद्योगिक सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी परिसरातील उद्योजक व कारखानदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. उद्योग क्षेत्र आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून सुरक्षित व गुन्हेमुक्त औद्योगिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
बैठकीत औद्योगिक परिसरातील वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्यांमध्ये चोरीच्या घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कायम कार्यान्वित ठेवणे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे, मजबूत कंपाउंड वॉल उभारणे तसेच प्रवेश व निर्गमन नियंत्रण प्रणाली प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच औद्योगिक परिसरात होणारे वाहतूक अपघात आणि औद्योगिक दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, कामगारांना नियमित सुरक्षा प्रशिक्षण आणि अग्निसुरक्षा उपाययोजना अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्रातील काही औद्योगिक भागांमध्ये अमली पदार्थांच्या हालचाली व वापराच्या घटना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी परिसरातही विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. संशयास्पद हालचाली, अनोळखी व्यक्ती किंवा कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश उद्योजकांना देण्यात आले.
औद्योगिक परिसरात कोणतेही आंदोलन, मोर्चा किंवा संघटनात्मक हालचाली होणार असल्यास त्याची माहिती आगाऊ स्वरूपात पोलिस प्रशासनास देण्यात यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. उद्योगांना ब्लॅकमेलिंग किंवा दबावतंत्राद्वारे त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला.
जळगाव शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी सुरक्षित, शिस्तबद्ध व भयमुक्त वातावरण आवश्यक असल्याचे नमूद करत एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणांना वेळेत प्रतिबंध करणे, सर्व कामगारांची चारित्र्य पडताळणी करणे तसेच प्राणघातक रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
याशिवाय रात्रीच्या गस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिल्यास पोलिस प्रशासनाकडून सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांसह प्रभावी नाईट पेट्रोलिंग व्यवस्था उभारण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link