एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

औषधविक्रेत्यांचा बंद; गरजूंच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘एफडीए’चा नियंत्रण कक्ष

औषधविक्रेत्यांचा बंद; गरजूंच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘एफडीए’चा नियंत्रण कक्ष

औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सुसज्ज

प्रतिनिधी निळकंठ वसु पाटील

अकोला, दि. 18 : औषध विक्रेता संघटनेने 20 मे रोजी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औषधांचा पुरवठा सुरळीत व अखंडित राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गरजूंच्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक औषधे उपलब्ध राहावीत यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी अन्न व औषध प्रशासनाकडून समन्वय साधण्यात येत आहे.
अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. प्रत्येक तालुका व गाव पातळीवर आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०१५०६८७ वर संपर्क साधल्यास तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच acdrugsakola@gmail.com या ई-मेलवरही संपर्क साधता येईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी केले.
००००

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link