एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अन्यायकारक पेट्रोल – डिझेल – गॅस दुधाच्या दरामध्ये केलेल्या वाढीचा तीव्र जाहीर निषेध

हिंगणघाट शहरातील कारंजा चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक पेट्रोल – डिझेल – गॅस दुधाच्या दरामध्ये केलेल्या वाढीचा तीव्र जाहीर निषेध

प्रतिनिधी सरवर खान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस तसेच दुधाच्या दरामध्ये केलेल्या वाढीचा तीव्र निषेध करण्याकरता स्थानिक कारंजा चौक हिंगणघाट येथे सोमवारला सायंकाळी पाच वाजता माननीय संपर्क प्रमुख व माजी राज्यमंत्री श्री अशोकभाऊ शिंदे यांच्या सूचनेनुवरून जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र खूपसरे , उपजिल्हा प्रमुख श्री सतीश धोबे ,तालुका प्रमुख मनीष देवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे बाजारातील जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, अन्नधान्य, बांधकाम साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एलपीजी गॅसच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे घरगुती अर्थकारण कोलमडले असून सामान्य कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
दुधाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच लहान मुलांच्या कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आले असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे केंद्र सरकारने तात्काळ इंधन, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण आणावे तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
या निषेध आंदोलनात सर्वश्री प्रकाश अनासाने, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे, अमोल वादाफळे, शितल चौधरी, हिरामण आवारे, भास्कर मानकर, संजय पिंपळकर, दिलीप चौधरी, गजानन काटोले, सुभाष काटकर, गुणवंतराव वानखडे, नारायण घ्यारे, प्रमोद एडलेवार, प्रशांत कांबळे, सचिन पोटदुखे, संजय रहाटे, सुरेश गायकवाड, गणेश वडूले, मन्ना कशीनिवास, विलास निनावे, प्रमोद खडतकार, विजय आष्टणकर, रमाकांत घ्यारे, विनोद मोहोड, विजय कोरडे, विलास धोबे, दिलीप कुमरे, लक्ष्मण कापकर, सुरेश लढी, राजेश भोंडे, सुधाकर अगडे, नाना ठोंबरे, गिरीश देवतळे, श्याम बोरधरे, विकास दाणी, राहुल मोहितकर, शंकर भोंमले, नितीन गोरखेडे, सुधाकर इंगोले, शांताराम मुरकुटे, दिलीप झोरे, अनिल कडू, संजय अंबोरे, विकास राऊत, नरेश तामगाडगे, किशोर नेटके, प्रकाश भुसारी, दीपक मेश्राम, दत्ता भोयर, बलराज डेकाटे, संजय तराळे, हेमंत भोयर,राजू बदाडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link