एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

परवाना रद्द होणार! जळगाव पोलीस अधीक्षकांचा वाईन शॉप चालकांना कडक इशारा

परवाना रद्द होणार! जळगाव पोलीस अधीक्षकांचा वाईन शॉप चालकांना कडक इशारा

जळगाव उप संपादक| प्रणित काठोके

वाईन शॉप आणि दारू दुकानाच्या परिसरात, रस्त्यावर किंवा खुल्या जागेत उघड्यावर दारू पिणाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास आता खपवून घेतला जाणार नाही. अशा मद्यपींना दुकानाकडून कोणतीही सेवा किंवा सुविधा पुरवली गेल्यास थेट वाईन शॉपचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाईल, असा कडक इशारा जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून एक अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे पार्श्वभूमी?
जळगाव जिल्ह्यातील अनेक वाईन शॉप आणि दारू दुकानांच्या परिसरात, आजूबाजूला किंवा समोरील रस्त्यावर मद्यपी बेकायदेशीरपणे उघड्यावर दारू पिण्यासाठी बसत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी या मद्यपींना दुकानामार्फतच अप्रत्यक्ष सेवा पुरवली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या.
उघड्यावरील या मद्यप्राशनामुळे परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले आणि येण्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग होऊन गंभीर गुन्हे घडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत पोलीस प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.
पोलीस प्रशासनाचे दुकान चालकांना ३ कडक आदेश:
१) सुविधा पुरवण्यास पूर्ण बंदी: वाईन शॉपच्या बाजूला किंवा परिसरात कोणत्याही व्यक्तीला मद्यप्राशन करण्यासाठी जागा, खुर्च्या, पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ किंवा इतर कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सुविधा दुकानदाराने किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुरवू नये. याची संपूर्ण जबाबदारी मालकाची असेल.
२) परिसरावर कडक नियंत्रण: दुकानातून मद्य खरेदी करून कोणतीही व्यक्ती बाहेर मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर दारू पिणार नाही, यावर दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः कडक लक्ष ठेवावे. तसेच, दुकानाच्या दर्शनी भागात तसा फलक (बोर्ड) लावावा.
३) बळजबरीने हटवणे: जर कोणी इसम दुकानाच्या बाजूला किंवा रस्त्यावर मद्यप्राशन करताना आढळल्यास, त्याला तात्काळ तेथून हटवण्याची जबाबदारी दुकान व्यवस्थापनाची असेल. मद्यपी ऐकत नसतील तर त्यांना हटवण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी.
उल्लंघन केल्यास थेट ‘ही’ होणार कारवाई!
पोलीस अधीक्षकांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही वाईन शॉप किंवा दारू दुकानदाराने वरील नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांचा परवाना निलंबित अथवा रद्द करण्याची शिफारस थेट राज्य उत्पादन शुल्क (Excise Department) विभागाकडे केली जाईल. तसेच, नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार आणि संबंधित मद्यपींवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे परिसरातील महिला आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आता वाईन शॉप चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link