एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कलावंतांना दादांचा कायम पाठिंबा राहिला:- सबसे कातील नृत्यांगना गौतमी पाटलांनी वाहिली आदरांजली

*कलावंतांना दादांचा कायम पाठिंबा राहिला:- सबसे कातील नृत्यांगना गौतमी पाटलांनी वाहिली आदरांजली! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. महाराष्ट्रांतील लोकप्रिय नृत्यांगना सबसे कातील गौतमी पाटील यांनी दिवंगत नेते अजित पवार (दादा) यांच्या निधनानंतर तीव्र दुःख व्यक्त करत आदरांजली वाहिली. अजित दादांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसल्याचे व त्यावर विश्वास बसत नसल्याचेही त्यांनी सांगितलं, (कलाकारांचा पाठीराखा) दादांनी कायम कलाकारांना पाठिंबा दिला आणि कोणतेही काम पूर्ण करण्याचे त्यांच्या आश्वासन ते पूर्ण करत असत असे गौतमी म्हणाल्या… (लाडकी नेते) अजित दादा हे महाराष्ट्रांचे लाडके नेते होते. आणि त्यांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे. असे सांगत त्यांनी जड अंतःकरणाने आदरांजली वाहिली. कधीही प्रत्यक्ष न भेटताही अजित दादांनी माझ्याबद्दल काढलेले कौतुकांचे शब्द लाखमोलाचे होते. अशी भावनिक आठवण गौतमीने सांगितली कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार नेता गमावल्याचे सांगत ही घटना धक्कादायक असल्याचेची म्हणाली, दादांनी माझ्याबद्दल जे काही शब्द वापरले होते, ते माझ्यासाठी कायम स्मरणात राहतील, असे सांगत तिने आपल्या भावुक शब्दांत आदरांजली अर्पण केली. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले, ज्यानंतर कलाकार क्षेत्रांतूनही शोक व्यक्त केला गेला,*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link