एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अहिल्यानगरच्या प्रगतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे योगदान मोलाचे डॉ. उद्धव शिंदे.

अहिल्यानगरच्या प्रगतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे योगदान मोलाचे – डॉ. उद्धव शिंदे.

प्रतिनिधी- सारंग महाजन.

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने त्यांचा शाल व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आपल्या कार्यकाळात अहिल्यानगर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रशासनाला लोकाभिमुख दिशा दिली आहे. विशेषतः सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आदर्श निर्माण केला आहे.
तसेच त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. पंकज आशिया यांना ‘राज्यस्तरीय सेवा हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला असून हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

“जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व नाविन्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याचा राज्यपातळीवर नावलौकिक झाला आहे.”
-डॉ. उद्धव शिंदे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link