नूतन ज्ञान मंदिर, अडावद विद्यालयात, ग्रंथ दिंडीचे आयोजन..
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
चोपडा तालुक्यातील अडावद येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा केला जात असतो. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सरा यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा समिती प्रमुख श्री सी जी परदेशी सर व मराठी विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा, कथाकथन, ग्रंथ प्रदर्शन आयोजन केले होते. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते.सुरुवातीला विद्यालयात मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर, उपमुख्याध्यापक श्री बी के साळुंखे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर, यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती एस आर बोरसे मॅडम, सौ एम एन भारुडे मॅडम, श्री सी जी परदेशी सर,श्री अतुल पाटील सर, श्री एस आर महाजन सर, श्री एस डी खोडपे सर, श्री एस एम साळुंखे सर उपस्थित होते. ग्रंथदिंडीचे आयोजन का आणि कशासाठी, त्याचे महत्त्व काय आहे, जीवनात ग्रंथ संत आणि भगवंत कसे महत्त्वाचे आहेत याविषयी श्री सी जी परदेशी सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. ग्रंथ हेच गुरू आहेत,ग्रंथ किंवा पुस्तके आपल्या आयुष्यात कशी साथ देतात, त्यांचे काय महत्त्व आहे, याविषयी मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी पालखी घेऊन विद्यालयातून गावाकडे प्रस्थान केले. यावेळी विद्यार्थिनींनी विविध भक्ती गीतांवर शिक्षकांसह ठेका धरला होता. संपूर्ण शालेय परिसरासह गावात देखील भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी गावातून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिक्षकेतर कर्मचारी हेमंत भाऊ महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यालयात ग्रंथदिंडीचे समारोप करण्यात आले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे आभार मानून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले.









