लोकमान्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
अमळनेर: दि. 21 ते 23 जानेवारी 2026 या रोजी अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर, नवीन मराठी शाळा व बाल विकास मंदिर या तिनही शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचा पहिल्या पुष्पात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा.धर्मसिंह धनसिंह पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर नगर परिषदेचे क्रीडा सांस्कृतिक विभाग व शिक्षण सभापती नवनिर्वाचित नगरसेवक शेख नाविद मुशीरोद्दीन तसेच डॉ.नीरजा सुरेश माहेश्वरी हे होते.
स्नेहसंमेलनाचा दुसर्या पुष्पात विद्यार्थ्यांसाठी असलेला रंगारंग कार्यक्रम घेण्यात आला यात विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य शिक्षण मंडळचे चिटणीस व श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक विवेकानंद लक्ष्मण भांडारकर हे होते. तर प्रमुख पाहुणे अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डाॅ.परीक्षित श्रीराम बाविस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ.स्वाती परीक्षित बाविस्कर हे होते.
तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रा.धर्मसिंह धनसिंह पाटील, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.प्रभाकर जगन्नाथ जोशी, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र काशिनाथ चौधरी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल राजाराम भोई, बालविकास मंदिराचे मुख्याध्यापक अनिता वैद्य आदी मंचावर विराजमान होते. यावेळी तिनही शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक संदिप महाजन, आशा सोनवणे, रेखा कांबळे, माधुरी सोनार यांनी केले तर रेखा कांबळे व मधुकर सोनार यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला संपूर्ण तांत्रिक सहाय्य उपशिक्षक भूषण महाले यांनी दिले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.









