एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

म्हसावद येथील थेपडे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

म्हसावद येथील थेपडे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

संस्थापक कै. पंढरीनाथ थेपडे यांचा ३१ वा स्मृती सोहळा उत्साहात; १५ हजारांच्या पारितोषिकांचे वाटप

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

जळगाव तालुक्यातील
म्हसावद येथे दि.१५जानेवारी २०२६ता जि जळगाव येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कै स्वा सै पंढरीनाथ धडुराम थेपडे संस्थेचे संस्थापक यांच्या 31 व्या स्मृती समारोह निमित्त इ. 10वी व 12वीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरावर तालुकास्तरावर विविध स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. डॉ. केदारजी थेपडे, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. बंकटभाऊ लढे तसेच म्हसावद नगरीतील वृत्तपत्र प्रतिनिधी समाधान पाटील, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व दापोरा येथील सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जी. डी. बच्छाव सर उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. बंकटभाऊ लढे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री जी. डी. बच्छाव सर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर केदारजी थेपडे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले व मुलींसाठी खास शिक्षणाची सुविधा देणार असे सांगितले.सदर कार्यक्रमात पंधरा हजार रुपयांची रोख पारीतोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस जे पवार सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. सचिन चव्हाण सर, पराग पाटील सर व श्री वाय पी चिंचोरे सर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. के. पी. पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link