पुणे येरवडा पोलिसांची दमदार कामगिरी
येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर
हत्यार घेऊन जबरी गृहप्रवेश करणा-या आरोपींना २४ तासात केले जेरबंद
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
दि.०५/०१/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत नगर-पुणे रोड, कल्याणीनगर येथे एका अपार्टमेंट मध्ये दिवसा घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर बाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकार हा दिवसाढवळ्या घडल्याने फिर्यादी यांचे मनात भिती निर्माण झाली होती, सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीना तात्काळ ताब्यात घेणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
उपायुक्त, परिमंडळ ०४,श्री. विलुमूला रजनिकांत, जैतापुरकर, यांनी देखील सदरबाबत सुचना केल्या सदर सुचनांव्या अनुषंगाने मा. पोलीस मा. सहा.पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. सुनिल होत्या त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथक प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोलीस अंमलदार बालाजी सोगे, नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे हे तात्काळ तपासकामी रवाना होऊन सदर भागात जाऊन पाहणी करुन त्याठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये फिर्यादी यांचे घराशेजारील सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता त्यात तीन इसम हे घटनेच्या वेळी तोंडाला मारक लावुन व डोक्यात हेल्मेट घालून फिर्यादी यांचे घरात जाताना व काही वेळाने परत येताना दिसून आले. सदर इसमांबाबत पोलीस स्टेशन हद्दीत तपारा करत असताना पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोलीस अंमलदार नटराज सुतार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा फिर्यादी यांचे घरातील विधीसंघर्षित बालकाने त्यांचे मित्रांचे मदतीने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार १. यश मोहन कु-हाडे, वय-२०, रा-केसनंद, ता-हवेली, पुणे. २. रुषभ प्रदिप सिंग, वय-२१, रा-च-होली, पुणे. ३. प्राज विवेक भैरामडगीकर, वय-१८, रा-येरवडा, पुणे तपासकामी ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा पलॅटचे थकलेले भाडे देण्यासाठी केल्याची कबुली दिली. नमुद आरोर्पीना अटक करण्यात आले असुन पुढील तपास पोउनि महेश फटांगरे हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ श्री.चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. सुनिल जैतापुरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजय ठाकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, येरवडा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे यांनी केलेली.








