*रहिमतपूर पोलिसांकडून अकॅडमी विद्यार्थ्यांचा हरविलेला मोबाईल केला परत ! संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. रहिमतपूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एका अकॅडमीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा किंमत 20,000 रूपयांचा हरविलेला मोबाईल रहिमतपूर पोलिसांकडून अगदी तात्काळ शिताफीने लोकेशनच्या द्वारे यंत्रणेच्या तपास मदतीने रहिमतपूर पोलीस ठाणेचे स.पो.नि. सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यांनी अखेर या मोबाईलचा शोध घेतला. अकॅडमी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसून आले, यावेळी पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे या अकॅडमी विद्यार्थ्याने मानले आभार, यावेळी सदर हरविलेला मोबाईल हा रहिमतपूर पोलीस ठाणेचे आदरणीय प्रभारी अधिकारी सचिन कांडगे साहेब यांच्याहस्ते व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित संबंधित अकॅडमी विद्यार्थ्याला परत करण्यात आला आहे.*








