एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे पर्वती पोलिसांची धमाकेदार कामगिरी

पुणे पर्वती पोलिसांची धमकीदार कामगिरी

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर

प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

सोन्या चांदीचे दागिने पॉलीश करुन देण्याचे बहाण्याने लुट करणारी पर राज्यातील टोळी पकडुन फसवणुक केलेले २० ग्रॅम वजनाचे सोने केले जप्त.

दि.२१/१२/२०२५ रोजी सनं १३०, जयमहाराष्ट्र मित्रमंडळ जवळ, चारभुजा दुकाना शेजारी, दांडेकर पुल. पुणे. येथे फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे बांगडया पॉलीश करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन हातचलाखीने दोन अनोळखी इसगांनी स्वतःचे आर्थिक फायदयासाठी, लबाडीचे झरादयाने हातचलाखी करून सोन्याच्या दोन बागजवा घेवून गेले आहेत. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) प्रगाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपास गा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे गार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी श्री. किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार अमित चिव्हे, नानासो, खाडे, राकेश सुर्वे, प्रसाद पोतदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, करुन मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन सापाळा रचुन आरोपी नाने १) शिवकुमार विनोद साह, वय २१ वर्षे रा. ग्राम पज, गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, २) प्रितमकुमार सुशिल साह, वय २३ वर्षे, रा. ग्राम पज, गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे ३) गोविंद सुशील साह, वय २९ वर्षे, रा. ग्राम पज, गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे ४) मदन गंगा भगत, वय २३ वर्षे, रा. गाव तुलसीपुर, जमुनिया तहसिल साहु प्रबत्ता जिल्हा भागलपुर सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे व ५) राजा रामबारानी यादव बय ३२ वर्षे रा. ग्राम लखरा तहसिल गोपालपुर, जि. भागलपुर बिहार सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे यास अत्यंत शिताफीने पकडून त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असून त्याचे ताब्यातुन २० ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड, तसेच पॉलिश करण्याचे साहित्य असा एकूण २,५०,३००/- रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, महेश मंडलिक, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, सुर्या जाधव स्वप्निल घुगे, सद्दाम शेख, गनोज बनसोड, किर्ती भोसले, व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link