संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,
03 आरोपींकडुन 8,70,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
—————————————————————————————————————————————
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डीले, महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 04/01/2026 रोजी संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अब्दुल समद जावेद कुरेशी रा. भारतनगर, संगमनेर हा त्याचे साथीदारासह गल्ली नं.06 जमजम कॉलनी संगमनेर येथे स्वतःचे जागेत पत्र्याचे शेडमध्ये गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत असल्याची पथकास माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी 03 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असतांना दिसुन आले. त्यावेळी पथकाने 03 इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) अब्दुल समद जावेद कुरेशी वय- 27 वर्षे रा. गल्ली नं. 02 भारतनगर, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, 2) सकलेन जाकीर कुरेशी वय- 30 वर्षे रा. सदर, 3) रेहान अल्ताफ शेख, वय – 20 वर्षे रा. दिल्ली नाका, इस्लामपुरा, संगमनेर ता.संगमनेर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमांचे ताब्यातुन 8,70,000/- रुपये किमतीचे 2900 किलो गोमांस, 800/- रुपये किमतीची एक कुऱ्हाड, कासन व सुरी असा एकुण 8,70,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 23/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (ब), 5(क), 9, 9(अ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.








