घरातून सोने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास नेपाळ देशात पळून जात असताना बाराबंकी,उत्तर प्रदेश येथून शीताफिने अटक केले
सर जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई
दिनांक 07/11/2025 रोजी तक्रारदार नामे अली अब्दुल कादिर नागरमठ यांच्या भेंडी बाजार जंक्शन, पायधूनी, मुंबई येथील राहते घरातून त्याचे मुलीचे कपाटात ठेवलेले 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ते बाहेर गेले असताना कुणीतरी चोरून नेले म्हणुन अनोळखी इसमाविरोधात सर जे जे मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सर जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे पो उप नि प्रशांत नेरकर व पथक हे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सीसीटीव्ही मध्ये एक इसम
संशईतरित्या जाताना दिसून आल्याने त्याची माहिती घेतली असता तो उत्तर प्रदेश येथील सराईत आरोपी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून माहिती घेतली असता तो मोबाईल नंबर बंद मिळून आला व सदर आरोपी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याची माहिती मिळवून आली.
सदर माहिती आधारे पो उप नि प्रशांत नेरकर व पथक हे तात्काळ गौडा, उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. व आरोपीत इसमाच्या गावात जाऊन गुप्त बातमीदार याचे मार्फत चौकशी केली असता आरोपीत इसम तेथे राहत नसल्याबाबत माहिती मिळून आली.
तसेच आरोपीत इसमावर लखनऊ येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळून आल्याने लखनऊ येथे जाऊन पथकाने तपास केला. दि.01/01/2026 रोजी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहिती आधारे आरोपी हा नेपाळ देशात पळून जात असताना त्यास बाराबंकी बस स्टॅन्ड उत्तर प्रदेश येथे शीताफिने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
➡️ *अटक आरोपी -* सज्जन सत्तार खान, वय 22 वर्षे, रा ठी – गाव गौरा सिन्हापूर ता. कर्नलगंज, जिल्हा गोंडा राज्य उत्तर प्रदेश.
▶️ *तपास मार्गदर्शन :-*
1) मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, मुंबई.
2) मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंगरी विभाग, मुंबई
3) मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई
➡️ *तपासी पथक* –
पो उप नि प्रशांत नेरकर, (DO)
पो ह तडवी, पो शी घाडगे, पो शी कोलपुसे, पो शी शेवरे, पो शी डावरे, पो शी चौधरी.








