जनतेच्या प्रेमातून अविस्मरणीय वाढदिवस साजरा करण्यात आला
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
जनतेच्या प्रेमातून अविस्मरणीय वाढदिवस साजरा
आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने मी भारावून गेली आहे.
काल माझा व आमच्या नेत्या, मार्गदर्शक माझ्या सासू मा. सौ. सुप्रियाताई पाटील आम्हा दोन्ही सासू सुनांचा आपण जिल्हा भरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोशमय वातावरणात वाढदिवस साजरा केलात या बद्दल मी पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करते.
तसेच नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसला चांगले यश मिळाले. या बद्दल नवनिर्वाचित नगराध्यक्ष कु. अक्षया नमिता प्रशांत नाईक, श्री. प्रशांत नाईक तसेच अँड. सौ. मानसीताई म्हात्रे आणि सर्व नगरसेवकांचा शेकाप सरचिटणीस मा. आमदार भाई जयंत पाटील आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जल्लोशमय वातावरणात सन्मान करण्यात आला.
काही थोड्याफार मतांच्या फरकाने आघाडीतील तीन उमेदवारांना अपयश पत्करावे लागले त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे.
निवडणूका येतात आणि जातात आपण ठाम आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे, आपले काम प्रामाणिक आहे पुढे विजय आपलाच आहे.
वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा रुपी आशिर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मनःपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा अलिबाग नगरपालिकेतील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन…

शेकाप अभिष्टचिंतन सोहळा समिती, अलिबाग तालुका चिटणीस श्री. सुरेश घरत, महिला आघाडी अध्यक्षा सौ. नागेश्वरी हेमाडे व इतर विविध आघाडी पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली सर्वांचे मनःपूर्वक आभार.








