युनिट-२, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांची धमाकेदार कामगिरी
विधीसंघर्षित बालकाकडून पिस्टल व काडतुस जप्त
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार दि.११/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ हददीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे व उज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमी मिळाली की, तळजाई वसाहत सहकारनगर पुणे येथे सार्वजनिक रोडवर अंगात पांढरे रंगाचा शर्ट व निळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला एक इसम अग्नीशस्त्र जवळ बाळगुन थांबलेला आहे. सदरची मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या प्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तळजाई वसाहत सहकारनगर पुणे येथे सार्वजनिक रोडवर विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडून १ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,४००/-रु. किं. चा मुददेमाल जप्त केला आहे.
सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५३१/२०२५ शत्र अधिनियम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालु आहे. सदर विधीसंघर्षित बालकावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुसेगाव पोलीस स्टेशन, जि. सातारा येथे खुनाचा प्रयत्न व पर्वती पोलीस स्टेशन येथे वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, गा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांचे सुचनेप्रमाणे सपोनि अमोल रसाळ, सपोनि कवठेकर, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, योगेश मांढरे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, शंकर नेक्से, विजय कुमार पवार, संतोष टकले, ओमकार कुंभार, नागनाथ राख, संदिप शिर्के, विशाल दळवी, अजीम शेख व सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केली आहे.







