“महाराष्ट्र गौरवरत्न “पुरस्कार 2025 अवॉर्डने..दिपक सुधाकर रणनवरे ( RD MASTER ) सन्मानित.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार 2025 श्रीरामपूर येथे आयोजित केला असून नृत्य दिग्दर्शक सिने अभिनेता गणेश यादव यांच्या हस्ते दीपक सुधाकर रणनवरे ( RD MASTER ) यांना प्रधान करण्यात आला. दिपक 13 वर्षाच्या असताना अतिशय स्ट्रगल करून डान्स एक्टिंग या क्षेत्रामध्ये आपले पाऊल ठेवले आहे. दिपक डान्स हे त्यांच्या वडिलांमुळे शिकले असून वडिला गुरु होते .त्यांना डान्स यावा म्हणून बऱ्याच वेळा मार पण दिला आहे. दिपक मूळचा टाकळीभान तालुका श्रीरामपूर चा आहे 2003 मध्ये कोपरगाव मध्ये आल्यानंतर बेकरीमध्ये चहाच्या , वडापावच्या हॉटेलमध्ये काम करून शाळा शिकला. गणपती / नवरात्री या उत्सवान मध्ये रोड शो पण करायचा व डान्स शिकत व शिकवत असताना त्याने 2017 पासून मराठी चित्रपटाचे साँग व अल्बम सॉंग मध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. पहिली मराठी फिल्म मध्ये अभिनेता व नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले. राज भालेराव यांनी दिपक यांना पहिले काम दिले. दिपक अतिशय स्ट्रगल प्रवास करून आज प्रसिद्ध कोरिओग्राफर व सिने अभिनेता आहे.








