नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा..
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
अडावद ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर (सिनि.)होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्री बी के साळुंखे सर, पर्यवेक्षक श्री के आर कनखरे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री बी पी महाजन सर, श्री व्ही एल राठी सर, सौ पी एस बाविस्कर मॅडम, श्रीमती एस आर बोरसे मॅडम, सौ एम एन भारुडे मॅडम, श्री के एस सावकारे सर,श्री एम एम पाटील सर, श्री एस एम साळुंखे सर, श्री एस डी चौधरी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस एम साळुंखे सर यांनी केले.सौ पी एस बाविस्कर मॅडम, श्री ए एस बिऱ्हाडे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश, शिका संघटित व्हा व संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय, वाचनाविषयी बाबासाहेबांच्या अंगी असलेला व्यासंगीपणा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री एम एम पाटील सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या अंगी असलेले शिक्षणाविषयी तळमळ, त्या काळातील समाजव्यवस्था याविषयी बाबासाहेबांचे विचार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थिनींनी बाबासाहेबांविषयी गीते सादर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री एस के मगरे सर श्री एम पी तायडे सर, श्री एस ए हळदे सर, श्री एस डी खोडपे सर, श्री एस आर महाजन सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी जी परदेशी सर यांनी केले तर आभार श्री एस डी चौधरी सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले.







