एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राजकीय पाठबळाने फोफावलेला वाळू माफिया! जुनगावमध्ये कोट्यवधींचा साठा उघडकीस, सिरोंचा प्रकरण पुन्हा? जुनगावमध्येही कोट्यवधींचा अवैध वाळूसाठा

गडचिरोली : राजकीय पाठबळाने फोफावलेला वाळू माफिया! जुनगावमध्ये कोट्यवधींचा साठा उघडकीस,
सिरोंचा प्रकरण पुन्हा? जुनगावमध्येही कोट्यवधींचा अवैध वाळूसाठा

जिल्हा प्रतिनिधी – मनोज उराडे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली

सिरोंच्यातील अवैध वाळू साठा प्रकरणाचे पडसाद अजून शांतही झाले नसताना, आता जिल्हा मुख्यालयालगतच्या जुनगाव परिसरातही कोट्यवधी रुपये मूल्याचा अवैध वाळूसाठा उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कठानी नदीकाठच्या शेतीघाटातून थेट मशीनद्वारे वाळू उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणावर महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. ९०० ब्रासपेक्षा अधिक अवैध साठा – तलाठीचा अहवाल दडपण्याचा प्रयत्न:-
४ डिसेंबर रोजी संबंधित तलाठीने सदर ठिकाणी पाहणी केली असता तब्बल ९०० ब्रासपेक्षा जास्त वाळूचा अनधिकृत साठा आढळून आला. हा अहवाल मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. मात्र संबंधित वाळू माफिया एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याने प्रकरण ठंड्या बस्त्यात टाकण्यासाठी काही अधिकारी जीवाचे रान करत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
या साठ्याची बाजारातील अंदाजित किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याने ‘महसूलमधील काहींचे हात रंगले आहेत’ अशी कुजबुज प्रशासनिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आहे.
तांत्रिक कारणांचा बोगस आधार
परवानगीच्या तुलनेत प्रत्यक्ष साठा अनेक पट जास्त असूनही काही अधिकारी ‘तांत्रिक कारणे’ पुढे करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जुनगावच काय, तर बामणी परिसरातही अशाच अवैध उपशाची उघड चर्चा आहे, परंतु अधिकारी त्याकडे जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे.
सिरोंचा प्रकरणाची पुनरावृत्ती?
काही महिन्यांपूर्वी सिरोंचा येथेही अवैध वाळू उपसा प्रकरण उघड झाले होते. सुरुवातीला खनीकर्म विभागातील अधिकाऱ्याने संशयास्पदरीत्या ‘क्लीनचिट’ दिली, परंतु पुढील चौकशीत २९ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आणि संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना निलंबनाचा फटका बसला होता. त्यामुळे जुनगाव प्रकरणातही नेमकी कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदारांचे मत “या प्रकरणाचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला आहे. संपूर्ण तपासणी करून पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.”
— सागर कांबळे, तहसीलदार, गडचिरोली

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link