दत्तजयंती निमित्ताने औंध येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
उप संपादक गणेश राऊत
श्री सुर्यामुखी गुरुदेवदत्त महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिशभाऊ रानवडे यांनी दत्तजयंती निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन व प्रतिभा कॉस्मेटिक्स अँड आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फुल बॉडी चेकअप करण्यात आले. किवा माय शॉपीचे सर्वेसर्वा डॉ चंद्रकांत खांडवे यांनी सर्वांचे चेकअप करून उत्कृष्ट मार्गदर्शन केले. डॉ रचना परमार यांनी वंध्यत्व निवारणवर उपचार यांवर महिलांना मार्गदर्शन केले. या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तीनशे पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सतीशभाऊ रानवडे, माधुरीताई रानवडे व सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ वाडेकर यांनी मान्यवरांचा सत्कार करून सन्मानित केले. वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिताताई गोसावी, सचिव शैलेंद्र निर्मळे सर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब उंडे, माधुरी शिंदे, स्मिता सावर्डेकर, शितल शिरसट व अमर शिरसट या सर्वांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.









