एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अकोला पोलिसांची धमाकेदार कामगिरी

अकोट पोलिसांची धमाकेदार कामगिरी

खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अकोट फाईल पोलीसांनी केली तात्काळ

प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील अकोट

 

पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला भागातील राजु नगर येथील राहणारे शेख राजु शेख निजाम वय ४१ वर्ष व त्यांची पत्नी शेख शमीम शेख राजु वय ३६ वर्ष यांच्यात फारकती संबंधाने कोर्ट मॅटर चालु आहे. शेख राजु व शेख शमीम असे दोन्ही एकत्रच राहत होते. शेख राजु हा तिचे पत्नीचे चारीत्रावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादविवाद होवुन भांडण होत होते. आज दि २४/११/२०२५ रोजी सकाळी १०.३० वा चे सुमारास शेख राजु याने पत्नीचे चारीत्रावर संशय घेतल्याने त्यांच्यात भांडण झाले त्यात शेख राजु याने घरातील धारदार चाकुने त्याची पत्नी शेख शमीम हीचे गळयावर वार करून तिला गभीर जखमी केले तिला उपचाराकरीता सरकारी दवाखाना येथे नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.

अकोट फाईल पोलीसांनी यातील आरोपी शेख राजु शेख निजाम वय ४१ वर्ष रा राजु नगर, अकोट फाईल अकोला यास तात्काळ ताब्यात घेतलेले असुन आरोपी अटकेची कार्यवाही चालु असुन घटनास्थळी फॉरेन्सिक टिम, डॉग स्कॉड तसेच पोलीस स्टेशन चा स्टाफ असुन पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन पुढील तपास अकोट फाईल पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक / श्री अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक / बदेली रेडडी. साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी/सुदर्शन पाटील सा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / शेख रहीम, सपोनि जनार्धन खंडेराव, पो उप नि शेख, डी. बी. पथक तसेच पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथील अंमलदारांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link