यशोदा माहिती अधिकारी प्रशिक्षण संस्था पुणे संस्थेस आरोग्यदुत पुरस्काराने सन्मानित
श्री. खंडूअण्णा गव्हाणे
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
दि २३: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर शासकीय आरोग्य उपक्रम अंतर्गत झालेल्या आरोग्याविषयी जनजागृती उपक्रम राबविणाऱ्या संस्था प्रतिष्ठाने यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य पुरस्कारामध्ये यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे यांना आरोग्य दूत पुरस्काराने ज्येष्ठ समाजसेवक मा.अण्णासाहेब हजारे राळेगणसिद्धी येथे ट्राफि सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमावेळी अण्णांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ कुर्ता टोपी देऊन अण्णांचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: श्री खंडूअण्णा भारत गव्हाणे, पुरुषोत्तम लोखंडे मा.पीएसआय तथा गुन्हे अन्वेषण मुंबई. पत्रकार यशोदा संस्था पुणेअध्यक्ष: आनघलक्ष्मी दुर्गा. संस्था सचिव,आदित्य गव्हाणे. संस्था खजिनदार,गौरव गव्हाणे. आदी मान्यवर उपस्थित होते पुरुषोत्तम लोखंडे यांनी मुंबई मधील पोलीस बिडी चाळ, व पोलीस महिला यांचे पेट्रोलिंग बंदोबस्त वेळी टॉयलेट बाथरूम व इतर सुविधा आरोग्या बाबत पोलीस सेवेतील वयस्कर यास अजीवन आरोग्यसेवा तसेच इतर समस्या विषयी अण्णांना आपल्या निवेदन पत्राद्वारे दिले असून अनघलक्ष्मी दुर्गा यांनी त्या करत असलेल्या आरोग्य समाजसेवा व देहू देवस्थान येथील तुकाराम महाराज देवस्थानच्या व संबंधित डोंगर उत्खननाबाबत देहू येथील इ संस्थेच्या माध्यमातून अण्णांकडे तक्रार निवेदन करण्यात आले. यशोदा संस्थापक खंडूअण्णा गव्हाणे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 व इतर कायदे प्रशिक्षण लवकरच परत चालू करणार आहोत त्यासाठी आपले सहकार्य मदत मार्गदर्शन असू द्यावेत असे त्यांच्या आशीर्वाद व सत्कार समारंभ वेळी अण्णांना कळविले असून कार्यकारिणी कार्यकर्ते सभासद अधिकारी कर्मचारी यांचाही या पुरस्कारांसाठी मोठा वाटा सहकार्य असून पुढील काळात उत्तम सामाजिक सहकार्य मार्गदर्शन प्रशिक्षण व समाजसेवा समुपदेशन करण्यासाठी यशोदा संस्था अग्रेसर राहील संबोधन करून इतर संस्था मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला..







