वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे संपन्न.
प्रतिनिधी संदीप जाधव
लघु व्यवसाय करणाऱ्या महिलांना शासकीय योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग कसे करायचे, कमी भांडवलमध्ये घरगुती व्यवसाय कोणकोणते करता येतील याचे मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजिका देवी तन्ना यांनी सर्वांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मार्गदर्शन झाल्यावर महिलांच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन खूप एन्जॉय केले. महिलांनी ताणतणावातून मुक्त व्हावे तसेच महिलांनी एकत्र येऊन प्रगती करावी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा योगिता गोसावी नेहमीच महिलांसाठी असे विविध उपक्रम राबवितात.








