मानवतेचा डॉक्टर नेञतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने
प्रतिनिधी तेजस विचारे
मोतीबिंदु शस्त्रक्रियेचा जागतीक विक्रमवीर ज्यांच्या नावे सुमारे २,०७,००० दोन लाख सात हजार तर दिवसाला २५० ते ३०० मोतीबिंदु शस्त्रक्रिया कधी कधी यासाठी १८ ते २३ तास काम
आजचा दिवस माझ्यासाठी खरच अविस्मरणीय ठरला. कारण मला स्वतःला तसेच डाॅ.प्रशांत भुईंबर त्याचप्रमाणे सामना वृतपत्राचे पञकार संजय देवकर आम्हा सर्वांना शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातुन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांना पाहताक्षणी जाणवले की मोठेपणा म्हणजे फक्त पद किंवा कीर्ती नव्हे, तर मनाची श्रीमंतीही असते.
भेटीदरम्यान त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, रुग्णसेवेची जबाबदारी आणि वैद्यकीय शिक्षणातील मूल्ये यावर मनमोकळा संवाद साधला. “रुग्णाला औषधापेक्षा आधाराची गरज असते,” हे त्यांचे वाक्य मनात खोलवर रुजले.
त्यांच्या प्रत्येक शब्दात माणुसकी झळकत होती. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रेरणा देणारी होती “आपण कितीही मोठे झालो तरी समाजाशी नातं जपलं पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांच्या डोळ्यांत होती ममता, आवाजात होता आत्मविश्वास, आणि व्यक्तिमत्त्वात होती साधेपणाची झळाळी.
त्यांची भेट घेतल्यानंतर एक गोष्ट मनोमन पटली “खरी माणुसकी म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यांत आनंद आणणे.”
ही भेट माझ्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण ठरली. कारण त्यांच्या भेटीतून मला केवळ एक डॉक्टर नव्हे, तर खऱ्या अर्थाने “मानवतेचा डॉक्टर” भेटला.
.









