अकोट ग्रामीण पोलिसांचे मोठे यश — सहा महिन्यांपासून फरार आरोपीला अखेर अटक
अकोट प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
– अकोट तालुक्यातील पोलिसांना मोठे यश मिळाले असून सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
दि. १६ एप्रिल २०२४ रोजी सौ. फुलाबाई देविदास उऐके(वय ५२, व्यवसाय – शेती मजुरी, रा. उमरा, ता. अकोट, जि. अकोला) यांनी आपल्या घरातील दरवाजा तोडून घरफोडी झाल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ११८/२४ कलम ३८०(९), ४५७(२), ३५२ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित निलेश श्रीकृष्ण इंगळे (वय २९, रा. उमरा, ता. अकोट) हा घटनेनंतर फरार झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज तपासणी, तसेच स्थानिक पातळीवर माहिती गोळा केली. परंतु आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांच्या हातात सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्यास पकडण्यात यश मिळवले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी उमेश चंद्र सोळंके सुनिल पाटील श्री प्रदीप राऊतश्रीराजेश माळेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी यांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले आहे.
अकोट ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरात पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.








