माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या धानोरा तालुका अध्यक्षपदी श्री. मोहन गावळे यांची गौरवशाली नियुक्ती!
प्रतिनिधी गडचिरोली : ज्योत्सना मिसार
समाजकार्यातील निष्ठा, पत्रकारितेतील प्रामाणिकपणा आणि माहिती अधिकाराबद्दलची जागरूकता या तिन्ही गुणांचा संगम असणाऱ्या श्री. मोहन खुशालराव गावळे यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या धानोरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या नियुक्तीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. गावळे हे उच्च शिक्षित, माहिती तंत्रज्ञानात प्रावीण्य संपादन केलेले आणि सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले उत्साही व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात पत्रकार म्हणून जनतेच्या प्रश्नांवर काम करत समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. गरीब, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्क, न्याय आणि अधिकारासाठी लढा देणे हे त्यांचे ध्येय असून त्यांनी अन्याय व अत्याचाराविरोधात नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.त्यांच्या कार्यातील गुणवत्ता, संघटनात्मक क्षमता, सामाजिक बांधिलकी आणि नि:स्वार्थ सेवा भावनेचा विचार करून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. महेश सारणीकर यांनी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज उराडे यांच्या शिफारसीनुसार त्यांची ही गौरवशाली नियुक्ती जाहीर केली.
या प्रसंगी धानोरा तालुका उपाध्यक्ष श्री. संजय कुडमेथे उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज उराडे यांनी श्री. गावळे यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. गावळे यांच्या या नियुक्तीबद्दल तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांच्याकडून समाजहिताचे आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.








