एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

अकोट प्रतिनिधी,निळकंठ वसू

अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने, महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी. शेतक-यांना हेक्टर 50 हजार आर्थिक मदत द्यावी. शेतक-यांचा फार्मर आय. डी. हि अट रद्द करण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या. सी+50% याप्रमाणे हमी भाव कायदा करण्यात यावा.
शेती मालावरील लागणारे (बी. बियाणे) इतर सर्व साहित्यावरील जी. एस.टी. रद्द करण्यात यावी.शेती उपयोगी सर्व साहित्य ऑनलाईन पध्दतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी… या सह शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी ,दि १० ऑक्टोंबर, रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले… यावेळेस सरकार विरोधात विविध घोषणा करण्यात आला, शासनाने मागण्या, पूर्ण करावे अन्यथा न केल्यास.. मुंबई नागपूर महामार्ग चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. अर्धा तास वाहतूक जाम झाली होती… मोठ्या रांगा लागल्या होत्या.. आंदोलन दरम्यान एक रुग्णवाहिका आली होती.. त्या रुग्णवाहिकेला. आंदोलन करतांनी. रस्ता मोकळा करून जाऊ दिले.. तसेच यावेळेस पोलिसांनी आंदोलन करते, रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके सह शेतकरी बांधवांना, दहिहंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. आंदोलन ठिकाणी पोलिसांचा. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त. होता.. आंदोलनात,रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके, माजी सभापती दिपक इंगळे,भारतीय किसान युनियन चे जिल्हा अध्यक्ष सुगत भटकर, प्रहार जनशक्ती पक्षांचे उपजिल्हाप्रमुख मंगलाताई पुंडकर, उल्हास पुंडकर,निजाम शाहा, संदिप इंगळे, जावेद शाहा, रामदास नवत्रे, दिनकर आढे, एकनाथ आढे,जनकराव भांडे, अमित बुंदे, पवन इंगळे, महादेवराव लोणे, प्रमोद इंगळे, भिकाजी बांगडे, बंडु कांबे, सुमित गवई, सह परिसरातील शेतकरी सहभागी होते..‌

चौकट….

पॅकेज वगळलेला, अकोला आणि मुर्तीजापुर तालुका, सबमिष्ट करावा … पूर्णाजी खोडके

 

सरकारने पॅकेज जाहीर केले आणि त्यामध्ये तालुके जाहीर केले. या तालुक्यामध्ये,अकोला जिल्ह्यातील, मुर्तीजापुर आणि अकोला तालुका यामधून वगळण्यात आला आहे.. या दोन्ही तालुक्यांचा सबमिट करण्यात यावे.. अन्यथा मुंबई नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना दिली आहे….

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link