गोर-गरिबांच्या आरोग्य विषय न्याय हक्कासांठी शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रतिनिधी तेजस विचारे
डोंबिवली येथील खंबाळपाडयात दोन दिवसांपूर्वी सर्पदंशाने भाची आणि मावशी यांच्या मृत्युची हृदयद्रावक घटना घडली. *४ वर्षीय भाची कु. प्रणवी* आणि *२३ वर्षांची मावशी श्रीमती श्रुती ठाकूर* या दोघीं नाही झोपेत असतांना सर्पदंश झाला. त्यांना ताबडतोब कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवली शास्त्रीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले,परंतु रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधां अभावी त्या दोघींना तात्काळ ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्याचा सल्ला रुग्णालयातील डॉक्टरांकडुन देण्यात आला,परंतु वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे भाची/मावशीला आपला जीव गमवावा लागला,याची
*शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा)* मार्फत दखल घेत शुक्रवार दि.०३ आक्टोंबर,२०२५ रोजी,शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष *डाॅ.किशोर ठाणेकर साहेब,* सरचिटणीस *श्री.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ* यांच्या आदेशाने तसेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख *श्री.दिपेश म्हात्रे साहेब* यांच्या मार्गदर्शनाने,ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक *डाॅ.प्रशांत भुईंबर,* ठाणे जिल्हा समन्वयक *श्री.एकनाथ अहिरे,* कल्याण जिल्हा सह-समन्वयक *श्री.अजित माने,* विधानसभा समन्वयक *श्री.अजिम शेख,* शिवसेना कल्याण शहर विधानसभा सहसंघटक *श्री.रुपेश चंद्रकांत भोईर,* शिवसेना कल्याण उप शहर प्रमुख *श्री.राजू दिक्षित, श्री.दिनेश शेटे,* शिवसेना विभाग प्रमुख *श्री.राजेश महाले,श्री. विकास रोकडे,* शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष ठाणे जिल्हा संघटक *श्री.प्रथमेश पुण्यार्थी* यांच्या प्रमुख उपस्थीत,कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभारी वैद्यकीय अधिकारी *डॉ दीपा शुक्ल* यांना सदर घडलेली घटना निर्दर्शनास आणुन देण्यात आली, त्याचप्रमाणे *कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या* अंर्तगत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा)* मार्फत देण्यात आले.
सदर घडलेल्या घटने बाबत लवकरच दखल घेतली जाईल आणि अपुऱ्या असलेल्या वैद्यकिय सुविधांचा पाठपुरावा केला जाईल,असे डॉ दीपा शुक्ल यांच्या मार्फत आश्वासन देण्यात आले,










