एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्वारगेट पोलिसांची धमाकेदार कामगिरी

स्वारगेट पोलीस स्टेशन हददीमधील घरफोडीचा गुन्हा केला उघड युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर पोलीसांची दमदार कामगिरी.

पुणे जिल्हा सहसंपादक :- गणेश महाडिक

पुणे ,दि.१९/०९/२०२५ रोजी सुयोग टॉवर गुलटेकडी पुणे येथे ऑफिसमध्ये सहाव्या मजल्यावर चोरी झालेबाबत गु.र.नं. २४४/२०२५ मा.न्या.सं.क.३०५ (अ) ३३१ (३) ३३१ (४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला असता गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नमुद गुन्हयाचा बिबवेवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड व स्वारगेट पोलीस स्टेशनचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पडताळणी करुन स्थानिक नागरीकांकडे चौकशी करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सहा. पो. निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, संजय जाधव ,शंकर नेवसे, यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने नमुद गुन्हयातील निष्पन्न केलेले आरोपी हे गंगाधाम चौकाकडून कोंढव्याचे दिशेन प्लसर मोटार सायकलवर जात असलेबाबत बातमी मिळाली असता सदर आरोपीतांना मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे ताब्यात घेवून त्यांना नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) निखिल विजय पवार वय १९ वर्षे, रा. सरगम चाळ क्रमांक ०७पी.जी.के.एन. स्कुल अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी पुणे २) अनुराग विजय पवार वय २१ वर्ष रा. सदर अशी सांगीतली.

सदर गुन्हयाबाबत त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांचे साथीदारांचे सोबत केलेचे कबुल केले असता त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेले ४०,०००/रु. रोख रक्कम व गुन्हा करुन पळून जाताना वापरलेली ८०,०००/- रु. बजाज प्लसर मोटार सायकल हस्तगत केली

दि.०३/१०/२०२५ रोजी सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे गौरव संजय पवार वय २० रा गुलटेकडी स्वारगेट पुणे याचा शोध घेवुन त्यांस अटक करुन याचेकडून गुन्हयातील चोरी केलेले ८५००/-रु रोख रक्क्कम व ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट हस्तगत केले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, सहा. पोलीस निरीक्षक रसाळ, सहा. पोलीस निरीक्षक कवठेकर, पोलीस अंमलदार जाधव, मोकाशी, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, आबनावे, जाधव, कुंभार, थोरात, मिलारे, शिंदे, तांबोळी, वगारेया व महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे यांचे पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link