आरोग्याचा विषय गंभीर तेथे शिव आरोग्य सेना नेहमीच खंबिर
प्रतिनिधी तेजस विचारे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली विधानसभा विभाग प्रमुख श्री.विपुल साळवी यांच्या परिचयाचे श्री.मनिष आरडे राहणार नालासोपारा पश्चिम यांचा १२ वर्षीय मुलगा कु. आयान आरडे यास वायरल इन्फेक्शन झाल्या कारणाने ताप व खोकला झाला.त्यानंतर तापाचे प्रमाण व इन्फेक्शन प्रचंड प्रमाणात वाढत गेले परिणामी न्युमोनीया सारख्या गंभीर आजाराला त्या १२ वर्षीय बालकास सामोरे जावे,न्युमोनिया इन्फेकशनमुळे अचानक त्या बालकाची प्रकृती गंभीर झाली त्याला तात्काळ मिरा रोड येथील वोकार्ड रुग्णालयात हलवण्याचा सल्ला स्थानिक डॉकटरांनी दिला. त्याप्रमाणे त्याला ताबडतोब सदर रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरू केले गेले, प्रकृती खालवल्याने त्याला व्हेंटीलेटरवर कृञीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले.कालांतराने प्रकृतीत चांगली सुधारणा देखील झाली, परंतु सर्वसामान्य कुटुंब असल्याकारणाने येणारे रुग्णालयाच्या बिलाचा यक्ष प्रश्न त्या कुटुंबाला भेडसावत होता,संपुर्ण कुटुंब चिंतेत होते,काहीही सुचत नव्हते,त्या कुटुंबाने त्यांच्या परिचयाचे दापोली विधानसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख श्री.विकास साळवी यांच्याकडे धाव घेतली, त्या विभागप्रमुखांनी शिवसेना ठाणे शहर प्रमुख श्री.अनिश गाढवे यांच्या बरोबर संपर्क साधला, शहरप्रमुखांनी लागलीच संपुर्ण घटना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख (शिव आरोग्य सेना) डाॅ.प्रशांत भुईंबर यांच्या कानावर टाकली, मग काय *”आरोग्याचा विषय गंभीर तेथे शिव आरोग्य सेना नेहमीच खंबिर” शिवसेना नेते श्री.राजनजी विचारे साहेब, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री.केदारजी दिघे साहेब, शिवसेना शहर प्रमुख श्री.अनिशजी गाढवे साहेब यांच्या आदेशाने आणि शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डाॅ.किशोर ठाणेकर साहेब तसेच सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने ठाण्याच्या शिव आरोग्य सेनेने मिरा रोड स्थीत वोकार्ड रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय प्रशासनास रुग्णाच्या कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थीतीची बाजु व्यवस्थीत रित्या मांडत वोकार्ड रुग्णालय प्रशासनाकडुन १,५५,०००/- रुपयांचे बिल माफ करुन घेतले,वोकार्ड रुग्णालयाने देखील चांगले सहकार्य केले,तद्प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डाॅ.प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक श्री.एकनाथ अहिरे,विधानसभा समन्वयक श्री.अजिम शेख,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आणि शिव आरोग्य सेनेचे मिरा-भाईंदर विधानसभेचे आरोग्य सैनिक श्री स्टिवन कार्डोज यांचे मोलाचे सहकार्याने लाभले,
या केलेल्या मदतीमुळे संपुर्ण आरडे कुटुंबियांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हाचे मनःपूर्वक आभार मानले










