गौतमी पाटील यांच्या कार व रिक्षा अपघातामधील रिक्षाचालकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा मधून मदत. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10:40 वाजता एका रिक्षाचालकाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव ब्रिज पुणे जवळ 30 सप्टेंबर 2025 रोजी नृत्तिका गौतमी पाटील यांच्या नावे असलेल्या कार व एक रिक्षा यामध्ये झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालक समाजी विठ्ठल मरगळ यांना गंभीर दुखापत झाली. रिक्षा चालकांची परिस्थिती ही हालाखीची असल्याकारणाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष श्री मंगेश चिवटे साहेब यांच्याशी 3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:10 वाजता संपर्क केला असता तात्काळ दखल घेत 11:24 वाजता माझ्याबरोबरच त्यांच्या मुलीशीही संपर्क साधण्यात आला व मदतीसाठी प्रयत्न करण्यासाठी संपर्क साधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोथरूड पुणे या ठिकाणी उपचार चालू असून त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षामधून वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळण्यासाठी प्रोसिजर 4 ऑक्टोबर 2025 दुपारी 02:00 सुमारास पूर्ण करून देण्यात आली. व पिढीत रिक्षा चालकांच्या पत्नी, मुलगा, मुलगी व नातेवाईकांची विचारपूस करत त्यांना योग्य ते मार्गदर्शन व रुग्णालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची प्रोसिजर पूर्ण करतेवेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कांतभाऊ राठोड, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल अडागळे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुणे शहर प्रमुख सपकाळ साहेब, भोर तालुका उपाध्यक्ष गोपाल बांदल, सहकारी प्रतिभाताई महाले, ज्ञानदेव शिंदे, शरद पवार, गवळी आधी पदाधिकारी उपस्थित होते.










