पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी घेतली सदिंच्छा भेट…
प्रतिनिधी. संजय धर्मे
पुणे जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची आज रोजी त्यांच्या कार्यालयात जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत… संभाजी पुरी गोसावी सातारकरांनी सदिंच्छा भेट घेतली. यावेळी अजिंक्य न्यूज महाराष्ट्राचे संपादक संतोष लांडे उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचशी मनमोकळा संवाद साधला. श्री. पाटील यांनी यापूर्वी विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सहाय्यक संचालक मंत्रालय सहाय्यक संचालक विभागीय माहिती कार्यालय पुणे तर अकोला वाशिम सातारा लातूर आणि जळगांव येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना उपक्रम आणि विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. श्री. युवराज पाटील यांच्या या सदिंच्छा भेटीत त्यांना सातारा जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केल्याची आठवण झाली. सध्या श्री. युवराज पाटील हे पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच पदभार घेतला असून जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहत आहे.








