एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पीआय दराडे हनीट्रॅपच्या जाळ्यात, कारकीर्द प्रतिमेला तडा..!! जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच अडचणीत आणले..!!

पीआय दराडे हनीट्रॅपच्या जाळ्यात, कारकीर्द प्रतिमेला तडा..!! जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच अडचणीत आणले..!!

संभाजी पुरीगोसावी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

आजकाल आपल्या नात्यांमध्ये प्रेम किंवा कोणतेही जिव्हाळ्याचं नातं असू द्या आपला पूर्णतः विश्वास समोरच्या व्यक्तीवर कधीच ओवाळून टाकू नका, कारण हवामान आणि माणूस कधी बदलेल हे सांगता येत नाही. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात मागील आठ दिवसांपूर्वी पीडित तरुणीने अत्याचारांचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दराडे यांनी मंगळवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधित तरुणीसह अन्य साक्षीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचारांचा गुन्हा दाखल होताच पोलीस दलात देखील चर्चेला उधाण आले होते. पीआय दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. दराडे यांच्या नातेवाईकांच्या मुंबईतील हॉटेलमध्ये‌ रिलेप्शानिस्टार म्हणून काम करणाऱ्या तरुणीसोबत दराडे यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, पीडित तरुणीने वैयक्तिक कारणास्तव दराडे यांच्याकडून वेळोवेळी रुपये दहा हजार रुपये हुन अधिक रक्कम वेगवेगळ्या कारणास्तंव दराडे यांच्याकडून तरुणीने घेतली फिर्यादीत नमूद केले दरम्यान आता दराडे यांना तरुण विषयी जवळीक साधता येणार नाही. केवळ धमक्या न देता आधी 2 दोन कोटी व नंतर 1 कोटी रुपयांची सरळसरळ मागणी करण्यात आली होती. 16 सप्टेंबर रोजी थेट कोतवाली पोलिस ठाण्यात येवुन दोन कोटी रुपये द्या नाहीतर सर्वांसमोर हार घालून लग्न करा नाहीतर अत्याचारांचा गुन्हा दाखल करीन अशी धमकीही पीआय दराडे यांना लगावली होती. संबंधित व्यक्तीने सुरुवातीला दराडे यांच्यासोबत जवळीकता ठेवून शेवटी त्यांनाच अडचणीत आणले, पीआय दराडे यांच्या भोवती ह जाळे त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने लावल्याची चर्चा आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक फसवणूक नसून संगनमताने आखलेली जाळेबाजींचा खेळ असल्याचा तपासात समोर आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link