इटली येथे 20 सप्टेंबर 2025 IRONMAN (आयर्नमॅन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
दि. 20 सप्टेंबर2025 इटली मध्ये IRONMAN (आर्यनमॅन) स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील श्री.महेश तानाजी भेगडे व श्री.विशाल शेटे यांनी ही सगळ्यात अवघड समजली जाणारी स्पर्धा पूर्ण केली आहे. या स्पर्धेमध्ये धावणे ,सायकलींग आणि पोहणे या तीन खेळांचा समावेश असतो. स्पर्धेमध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे हे तीन प्रकार आहे. महेश भेगडे यांनी गेली 3 वर्ष अथक परिश्रम घेऊन रोज 3 ते 4 तास सराव करून त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाच्या इच्छे खातर IRONMAN (आर्यनमॅन) ची पदवी स्वतःच्या नावावर कोरली. त्यांच्या संपूर्ण IRONMAM (आर्यनमॅन) होण्याचा प्रवास हा सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या परिवाराकडूनही त्यांना अमुल्य अशी साथ मिळाली. वेद भाळशंकर, विवियन फर्नांडिस आणि समस्त तळेगावकरांकडुन त्यांना या अभूतपूर्व यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा.









